धुळ्यानजिक वडेलजवळ गावठी दारु नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:02 IST2018-10-21T12:01:58+5:302018-10-21T12:02:55+5:30
पश्चिम देवपूर पोलीस : कारवाईचे गावातून कौतूक

धुळ्यानजिक वडेलजवळ गावठी दारु नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील वडेल गावानजिक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गावठी दारुचा अड्डा उध्वस्त केला़ गावाजवळ अड्डा तयार झाला असून दारु विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सतिष गोराडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक के़ एल़ सोनवणे, पोलीस कर्मचारी गणेश पाटील, परशुराम पवार, किरण कोठावदे, अनिल गायकवाड, विश्वास पाटील, महिला पोलीस कर्मचारी जमिला पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली़ महाराष्ट्र दारुबंदी महिला मोर्चाच्य गितांजली कोळी यांचीही यावेळी उपस्थिती होती़ याप्रसंगी पोलिसांनी ३ हजार लिटर दारुचा कच्चा माल फेकून नष्ट केला़