आढे येथे डेंग्यू जनजागृती व कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:49+5:302021-07-18T04:25:49+5:30
आढे गावात कोविड १९ चा प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्याची मागणी तालुका आरोग्याधिकारी डॉ.राजेंद्र बागुल यांच्याकडे पोलीस पाटील राजकिरण राजपूत ...

आढे येथे डेंग्यू जनजागृती व कोरोना लसीकरण
आढे गावात कोविड १९ चा प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर घेण्याची मागणी तालुका आरोग्याधिकारी डॉ.राजेंद्र बागुल यांच्याकडे पोलीस पाटील राजकिरण राजपूत यांनी निवेदन देऊन मागणी केली होती.त्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य सहायक के.बी. फुलपगारे यांनी पावसाळ्यात डेंग्यूविषयी घ्यायची काळजी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपरपंच योगेश पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील राजकिरण राजपूत,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खरदे डॉ.मनोज पाटील,समुदाय वैद्यकीय अधिकारी वाठोडा डॉ.मेघराज राठोड,माजी उपसरपंच दगडू पाटील, शांतीलाल जमादार,ग्रां.पं.सदस्य सुनील पवार,सुनील शिरसाठ,मुख्याध्यापक भटू चव्हाण आदी होते. आरोग्यसेवक एम.के. पगारे, आरोग्यसेविका आर.एन.वेंदे, आशावर्कर भारती पाटील, अंगणवाडी सेविका सुरेखा शिरसाठ,ग्रा.पं. शिपाई रामेश्वर जगदेव आदींच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले.