१५ रोजी उंटावद शिवारात ई-पीक पाहणी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला़ महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर राबविण्यात येत आहे. याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे़ तसेच शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत फार पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते, असे प्रतिपादन प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांनी केले.
या ई-पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन-तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महसूल विभागाने स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन निर्मिती केली आहे. शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाईल म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे आपली नोंदणी अचूक करावी, असे आवाहन तहसीलदार आबा महाजन यांनी केले.
या ॲपचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच राजकपूर मराठे, मंडळ अधिकारी प्रशांत ढोले, तलाठी शीतल गिरासे, मनीषा गिरासे, पृथ्वीराज गिरासे, रिजवान खान, अमृतसिंग राजपूत, पोलीस पाटील सातकर, प्रगतीशील शेतकरी योगेश पाटील, पिंटू घोरपडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़