शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:21+5:302021-09-19T04:37:21+5:30
याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील शिरपूर व साक्री तालुक्यातील बहुतांश भाग ...

शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्याची मागणी
याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील शिरपूर व साक्री तालुक्यातील बहुतांश भाग आदिवासी उपयोजना पेसा क्षेत्रात येतो. या भागात कार्यरत शिक्षकांना शासनाच्या निर्णयानुसार एकस्तर वेतन श्रेणी लाभ देण्यात येतो. शासन निर्णयानुसार आदिवासी भागात जोपर्यंत शिक्षक कार्यरत आहेत तोपर्यंत त्यांना एकस्तर वेतन श्रेणी लाभ देण्याचे आदेश आहेत. यापूर्वी याबाबतीत दोन वेळा निवेदने देण्यात आले आहे. पण याविषयी निर्णय झालेला नाही. काही जिल्ह्यांमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे शिक्षक कार्यरत असेपर्यंत त्यांना लाभ देण्यासह वसूल केलेली रक्कम परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या विषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, शिक्षणाधिकारी, वित्त व लेखाधिकारी, उपमुख्य वित्त व लेखा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, रूपेश जैन, गिरीश बागुल, सुभाष पगारे, सागर पवार, ज्ञानेश्वर बाविस्कर, अनिल गांगुर्डे, नरेंद्र पाटील, रामभाऊ पाटील, गणेश वाघ, सत्यवान शिरसाठ आदी उपस्थित होते.