अवजारांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:23 IST2021-06-30T04:23:31+5:302021-06-30T04:23:31+5:30
मोकाट गुरांचा धुमाकूळ धुळे : शहरात बाजारपेठांच्या भागात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. या गुरांनी धुमाकूळ घातल्यामुळे अपघातांची भीती ...

अवजारांना मागणी
मोकाट गुरांचा धुमाकूळ
धुळे : शहरात बाजारपेठांच्या भागात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. या गुरांनी धुमाकूळ घातल्यामुळे अपघातांची भीती वाढली आहे. गुरांची झुंज जुंपते त्यावेळी प्रसंगी पोलिसांना देखील यावे लागते. गुरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.
विद्युत खांब पडला
धुळे : येथील साक्री रोडवरील नेहरू पुतळा चाैकात अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्युत खांब पडला. महावितरणच्या प्रवेशद्वारासमोर हा खांब गेल्या महिन्यापासून तसाच पडून आहे. हा खांब धुळे महापालिकेचा आहे.
काटेरी झुडपे काढा
कुसूंबा : नेर ते बोरीस रस्ता काटेरी झुडुपांनी वेढला आहे. त्यामुळे समोरून येणारे वाहनही दिसत नाही.याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष घालून येथील काटेरी झुडुपे त्वरित हटविण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
घाणीचे साम्राज्य
धुळे : येथील जिल्हा परिषदेच्या समोर स्टेट बॅंकेच्या शेजारी असलेल्या बोळीत कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.