निर्यात बंदी तात्काळ उठवा कांदा उत्पादकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:55 IST2020-12-19T21:55:09+5:302020-12-19T21:55:29+5:30
पिंपळनेर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

निर्यात बंदी तात्काळ उठवा कांदा उत्पादकांची मागणी
पिंपळनेर : महाराष्ट्रात कांदा उत्पादक बऱ्यापैकी असून केंद्र शासनाने ६४ देशांमधील कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवुन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे यासह पदाधिकारी यांनी निवेदन देत भेट घेतली.
केंद्र शासनाने सप्टेंबर महिन्यात केलेली ६४ देशांमधील कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकºयांना दिलासा द्यायला हवा़ केंद्र सरकारने दि १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्याची निर्यातबंदी केलेली असुन देशात सर्वाधिक उत्पादन घेणाºया महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना या निर्यातबंदीचा फटका बसला आहे़ कांदा टंचाईच्या पार्श्वभूमिवर हि निर्यातबंदी तात्पुरती केल्याचे सरकार कडून सांगण्यात आले होते. आता महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमणात कांदा उपलब्ध झालेला आहे. तरी केंद्र सरकारने कांद्यावरील ६४ देशांमध्ये होणारी निर्यातबंदी तातडीने हटवावी व महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे या मागणीचे निवेदन देण्यात आले़
निवेदन देते वेळी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे, जयदीप भदाणे, चंद्रकांत शेवाळे, अभिमान पवार, विलास रौदळ, शेखर कापडणीस, भगवान जाधव, राजेंद्र बारगळला, वसंत देशमुख , किरण सोनवणे, समाधान गुंजाळ, सुनील ठोक, नयनी बच्छाव, दिगंबर धोंडगे, कैलास जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. आघाडी सरकारचे मंत्री, आमदार यांना यांना देखील हे निवेदन रजिस्टर करण्यात आले आहे.