एसटीत वारसाहक्काने नोकरी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:39+5:302021-05-12T04:37:39+5:30
याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव जावडेकर यांनी विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नोव्हेंबर २०११ ...

एसटीत वारसाहक्काने नोकरी देण्याची मागणी
याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव जावडेकर यांनी विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नोव्हेंबर २०११ पासून नेमणुकीची प्रकरणे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे अटी व शर्तींची पूर्तता करूनदेखील वारसांना सेवेत सामावून घेतले नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने सफाईगारपदी नियुक्ती देण्यासाठी महामंडळाने वेळोवेळी ठराव करून परिपत्रके काढली आहेत. तसेच धोरणात्मक निर्णयदेखील घेतले आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व विभागांना महामंडळाने केल्या आहेत. तरीदेखील गेल्या तीन वर्षांपासून वारसाहक्काची प्रकरणे प्रलंबित आहेत.
राज्यातील इतर विभागात वारसांना सेवेत सामावून घेतले आहे; परंतु धुळे विभागात मात्र प्रकरणे प्रलंबितच आहेत. वारसांना नोकरी मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित नोकरी द्यावी, अशी मागणी आहे.