मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:03 IST2020-01-21T23:03:20+5:302020-01-21T23:03:55+5:30

भुजल कॉलनी : महापालिकेच्या उपायुक्तांना हिंदू एकता आंदोलन संघटनेचे निवेदन

Demand for infrastructure | मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी

Dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूर येथील प्रभाग २ मध्ये भुजल कॉलनी, कृषी कॉलनी, आरती सोसायटी, पांडव नगर अशा परिसरात महापालिकेकडून मुलभुत सुविधा पुरविण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन प्रादेशिक पक्षातर्फे उपायुक्त गणेश गिरी यांना देण्यात आले़
देवपूर भागातील बहूसंख्य नवीन प्रभागात रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री चोऱ्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात़ याच प्रभागात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटारींची व्यवस्था केलेली त्यामुळे रस्त्यावर सांडपाणी वाहते़
सांडपाण्यामुळे कॉलनी भागात डासांचा प्रार्दुभाव वाढल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ मनपाने परिसरात मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी हिंदू एकता आंदोलन प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष मनोज घोडके, चेतन माळी, प्रशांत पाटील, महेश चव्हाण, भारती सोनार, किशोर पाटील, उमेश सोनार, जितेंद्र गिरासे आदींनी केली आहे़

Web Title: Demand for infrastructure

टॅग्स :Dhuleधुळे