बोरीसच्या बोरांना परराज्यात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:05 IST2019-12-27T22:04:47+5:302019-12-27T22:05:29+5:30

हवामानावर मात करत फळबागायत : बोरांची मोठ्या प्रमाणात विक्री; भाव मिळतो समाधानकारक

 Demand for Boris boroughs overseas | बोरीसच्या बोरांना परराज्यात मागणी

Dhule

कापडणे : धुळे तालुक्यातील बोरीससह, वडणे, बुरझड, निकुंभे परीसरात फळबायतत शेतकरी असून सध्याचे बदलते हवामान, धुक्याचे व ढगाळ वातावरण असतांना अनेकांच्या बोर फळबागायतीवर बुरशीजन्य रोगराई व उत्पन्नात घट असतांना परिस्थितीवर मात करत बोरांचे उत्पन्न उत्तमप्रकारे घेवून बोरे परराज्यात निर्यात होत आहेत.
बोरीस येथील शेतकरी देवराम आधार बेहेरे यांनी प्रतिकुल वातावरणातून दर्जेदार उमरान जातीच्या बोरांचे उत्कृष्ट उत्पन्न घेत परराज्यासह इतर ठीकाणी निर्यात करुन फळ विक्रीची भरारी मारली आहे.
बोरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने भाव ही योग्य मिळत असून या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले आहे. मात्र धुळे कृषी विभागाबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
सततच्या नापिकाला कंटाळलेला व कर्जबाजारी झालेला शेतकरी इतर पिकांचे नुकसान भरपाई निघावी म्हणून बोर पिकातून चांगले उत्पन्न होईल या आशेने व मनाची जिद्द आणि फळबायतीकडे दुर्लक्ष न करता बोरीस येथील शेतकरी देवराम बेहेरे या शेतकºयाने तीन एकर जमिनीवर उमरान जातीचे बोर लागवड केली. प्रतिकुल परीस्थिती व बदलते हवामान, ढगाळ वातावरण असतांना बोर पिकाची चांगल्या पध्दतीने निगा राखात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा संकल्प या शेतकºयाने केला.
परीसरात सर्वात उत्कृष्ट बोर असल्याने बिहारसह परराज्यातून व्यापारी येथून माल घेवून जातांना दिसत आहेत. थेट शेतातून माल निर्यात केला जात असल्याने पंचक्रेशीतील शेतकरीवर्ग थेट देवराम बेहेरे यांच्याकडे विविध मार्गदर्शन घेतांना दिसत आहे.
सध्या बोर तोडणी व १० किलोचे बॉक्स पँकिंग करुन प्रति किलो २५ते ३० रुपये भाव मिळत असल्याने याही पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता आहे. बोरीसचे शेतकरी बेहेरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title:  Demand for Boris boroughs overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे