कोरोना चाचणीसाठी २० हजार किटची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:32+5:302021-05-10T04:36:32+5:30
धुळे : कोरोनाच्या ॲंटिजन चाचणीसाठी आवश्यक किट संपले असून आरोग्य विभागाने २० हजार किटची मागणी हापकिन्सकडे नोंदवली आहे. कोरोनाचे ...

कोरोना चाचणीसाठी २० हजार किटची मागणी
धुळे : कोरोनाच्या ॲंटिजन चाचणीसाठी आवश्यक किट संपले असून आरोग्य विभागाने २० हजार किटची मागणी हापकिन्सकडे नोंदवली आहे.
कोरोनाचे तत्काळ निदान व्हावे यासाठी ॲंटिजन चाचणी केली जाते. रुग्णसंख्या कमी होत असली तरी गाफिल न होता चाचण्याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केल्या आहेत. परंतु जिल्ह्याच्या औषधालयात कोरोना चाचणीचे किट संपले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याआधी २० हजार किट जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले होते. त्यामुळे औषधालयात सध्या कोरोना चाचणी किटच्या बाबतीत ठणठणाट आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कोरोना चाचण्यांची संख्या आरोग्य विभागाने वाढवली आहे. आरोग्य केंद्रांच्या स्तरावर शिल्लक किटमुळे सध्या चाचण्या सुरू आहेत. परंतु लवकरच कोरोना चाचणी किटचा तुटवडा भासणार आहे.