जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही सुरू होत्या प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST2021-02-05T08:43:58+5:302021-02-05T08:43:58+5:30

धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर ...

Deliveries were also started during the Corona period in rural hospitals in the district | जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही सुरू होत्या प्रसूती

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही सुरू होत्या प्रसूती

धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर केले नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात साक्री तालुक्यात दोन रुग्णालये आहेत. तर धुळे, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामीण रुग्णालय आहे. साक्री तालुक्यात साक्री व पिंपळनेर येथे ग्रामीण रुग्णालय आहे व निजामपूर येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू झालेले आहे. धुळे तालुक्यात सोनगीर व शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी तसेच शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालय आहे.

साक्री येथील ग्रामीण रुग्णालय वगळता इतर ग्रामीण रुग्णालयात सीझेरियन प्रसूतीची व्यवस्था नाही. जर सीझेरियन करायचे असेल तर जिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना रेफर केले जाते. मात्र नॉर्मल प्रसूतीवरच ग्रामीण रुग्णालयात भर दिला जात आहे. नॉर्मल प्रसूती करणे शक्य नसेल तरच जिल्हा रुग्णालयात रेफर करीत असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांचे म्हणणे आहे. तसेच २०२० यावर्षी प्रसूतींची संख्या कमी झालेली नाही. केवळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयातच सीझेरियनची व्यवस्था आहे. इतर रुग्णालयांमध्ये रक्ताची व्यवस्था नसल्यामुळे त्याठिकाणी सीझेरियन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री येथील सीझेरियनचे प्रमाण मात्र कोरोना काळात खूपच कमी झाले आहे. २०१९ यावर्षी ६५ सीझर झाले होते तर २०२० मध्ये केवळ सहा सीझर झाले आहेत. २०२० या वर्षात थाळनेर येथे ४०, शिंदखेडा २१० व पिंपळनेर येथे ३४० प्रसूती झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

साक्री ग्रामीण रुग्णालयात नॉर्मल प्रसूतीसोबतच सीझेरियनचीदेखील व्यवस्था आहे. त्यासाठी आवश्यक सर्व सुविधा व रक्ताची उपलब्धता आहे. नॉर्मल प्रसूती करण्यावर अधिक भर दिला जातो. कोरोना काळातही ग्रामीण रुग्णालयात प्रसूती सुरू होत्या. शस्त्रक्रिया करण्यात काही गुंतागुंत असेल तर मात्र वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालयात रेफर करतो.

- डॉ. बी.पी. गोविल, वैद्यकीय अधीक्षक साक्री

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये - ५

महिलांना प्रसूतीसाठी रेफर केले - ०

Web Title: Deliveries were also started during the Corona period in rural hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.