राज्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक जातीनिहाय जनगणनेस टाळटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:27 IST2020-03-16T12:27:05+5:302020-03-16T12:27:29+5:30
बाळासाहेब कर्डक : समता परिषदेतर्फे ‘जनगणना पे चर्चा’ कार्यक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे : सन १९३१ नंतर दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत देशातील बहुसंख्य असणाºया ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना जाणीवपूर्वक टाळण्याचा यशस्वी प्रयत्न राज्यकर्त्यांकडून झाला आहे. देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीसह सर्वच मालमत्तेत वाटेकरी असणाऱ्यांना संख्येच्या तुलनेत अधिकारापासून वंचित ठेवणे ही देशाशी, जनतेशी प्रतारणा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे धुळे येथील ज्येष्ठ नागरिक संघात ‘जनगणना पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब कर्डक बोलत होते. यावेळी त्यांनी सातत्याने ही मागणी दुर्लक्षित करण्यात येत असल्याचेही सांगितले.
जोपर्यंत जातनिहाय ओबीसी जनगणनेच्या रकाना जनगणनेच्या फॉर्म मध्ये समाविष्ट केला जात नाही. तोपर्यंत या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्टीय पातळीवर घेतली असल्याचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी सांगितले. यावेळी बापू महाजन, कवीता क्षीरसागर, बी.बी. महाजन, एस.टी. चौधरी, मिलिंद सोनवणे, आण्णा माळी यांनीही विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कर्डक होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश बागूल, विभागीय संपर्क प्रमुख अनिल नळे, संतोष पुंड, जिल्हा कार्याध्यक्ष आर.के. माळी, उपाध्यक्ष गोकुळ पाटील, सचिव बापू महाजन, विलास माळी, महानगर प्रमुख गोपाळ देवरे, दिलीप देवरे, मिलिंद सोनवणे, मातंग समाज अध्यक्ष वाल्मिक जाधव, एस.टी. चौधरी, बी.बी. महाजन, लोहार समाज अध्यक्ष भानुदास लोहार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश बागुल, सतीश बाविस्कर, प्रकाश गवळे, दौलत जाधव, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र सुर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन आर.के. माळी यांनी केले. बैठकीला धुळे जिल्ह्यातून समता सैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.