ओबीसी आरक्षणासाठी ठेलारी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली रावलांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST2021-07-10T04:25:06+5:302021-07-10T04:25:06+5:30

या शिष्टमंडळात नामदेव ठेलारी, गोरख ठेलारी, समाधान धनगर, पंढरीनाथ ठेलारी, दीपक गिरासे, बाळू ठेलारी, योगेश धनगर, नामदेव धनगर आदी ...

A delegation from the Thelari community met Rawal for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी ठेलारी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली रावलांची भेट

ओबीसी आरक्षणासाठी ठेलारी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली रावलांची भेट

या शिष्टमंडळात नामदेव ठेलारी, गोरख ठेलारी, समाधान धनगर, पंढरीनाथ ठेलारी, दीपक गिरासे, बाळू ठेलारी, योगेश धनगर, नामदेव धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत या शिष्टमंडळाने आम्ही जरी एनटी प्रवर्गातील असलो, तरी आम्हाला राजकीय आरक्षण हे ओबीसीचे आहे. हे आरक्षण टिकले नाही, तर आम्हाला कोणत्याही राजकीय निवडणुकीमध्ये सहभागी होता येणार नाही. सर्वसाधारण प्रवर्गात मोठ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल, आम्ही कायमस्वरूपी वंचित राहू. म्हणून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरावा, तसेच आरावेजवळ रूपनरवाडी हे छोटेसे गाव आहे. सद्यस्थितीत वाडी शेवाडी प्रकल्पातून येणाऱ्या डाव्या कालव्याचे पाणी पोहोचण्यासाठी अडचण होत असून, तो कालवा दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली.

Web Title: A delegation from the Thelari community met Rawal for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.