धुळ्यात उपचार घेताना तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:49 IST2017-12-03T22:47:04+5:302017-12-03T22:49:26+5:30

महामार्गावरील घटना, कोळवले नगरात हळहळ

The death of the youth while taking treatment in Dhule | धुळ्यात उपचार घेताना तरुणाचा मृत्यू

धुळ्यात उपचार घेताना तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देगुरुद्वाराजवळील घटनाजिल्हा रुग्णालयात सुरु होते उपचारमृत तरुण कोळवले नगरातील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वाराजवळ गुरुवारी सकाळी ट्रक व दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू ओढविला. मृत तरुणाचे नाव अमर प्रताप पाटील (३५, रा. कोळवले नगर) असे आहे. 
अमर प्रताप पाटील (३५) हा त्याच्या दुचाकीने धुळ्याकडून अवधान गावाकडे जात होता़ त्याचवेळी एमएच १८ एसी ९९२९ क्रमांकाच्या ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली़ या अपघातात अमर पाटील याच्या पायावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याच्या पायास जबर दुखापत झाली होती. या प्रकरणी संतोष प्रताप पाटील यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल आहे.

Web Title: The death of the youth while taking treatment in Dhule