निधनवार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:27 IST2021-01-10T04:27:42+5:302021-01-10T04:27:42+5:30
निजामपूर : शांताबाई काशीनाथ जयस्वाल (रा.निजामपूर, ता.साक्री) यांचे ६ रोजी रात्री निधन ...

निधनवार्ता
निजामपूर : शांताबाई काशीनाथ जयस्वाल (रा.निजामपूर, ता.साक्री) यांचे ६ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या महेंद्र जयस्वाल यांच्या मातोश्री होत.
प्रल्हाद पाटील
तीसगाव : सेवानिवृत्त वाहक प्रल्हाद भुता पाटील (७२, रा. तीसगाव) यांचे वलवाडी येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते विक्रीकर निरीक्षक सागर पाटील यांचे वडील होत.
रामदास पाटील
धुळे : जिजामाता हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य रामदास दुला पाटील (९२, रा. धुळे) यांचे ९ रोजी पहाटे निधन झाले. ते जयहिंद सोसायटीचे सभासद हर्षदीप पाटील यांचे वडील होत.
विनायक पवार
कुसुंबा : विनायक रामचंद्र पवार (७२, पिंपळनेर) यांचे ९ रोजी पहाटे धुळे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते विमा प्रतिनिधी श्यामराव पवार त्यांचे मोठे बंधू होत.