पदव्युत्तर वर्गांच्या प्रवेशासाठी मुदत वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:14+5:302021-08-21T04:41:14+5:30
शिंदखेडा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. वर्गांच्या प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू असून विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी ...

पदव्युत्तर वर्गांच्या प्रवेशासाठी मुदत वाढवावी
शिंदखेडा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. वर्गांच्या प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू असून विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी दि.२० ऑगस्ट,२०२१ पर्यंत अंतिम मुदत घोषित केलेली आहे. ही मुदत ३० ऑगस्ट,२०२१ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी कुलगुरूंकडे केली आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यापीठांचे पदवीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, तसेच लगतच्या आलेल्या शासकीय सुट्यांमुळे कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना होत असलेला उशीर, साईटवरील अडचणी, शिवाय विद्यापीठातील बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप अंतिम वर्षाचे गुणपत्रक मिळालेली नाहीत, इ. विविध कारणांमुळे विद्यार्थी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करू शकलेले नाहीत. यासाठी पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची मुदत वाढविणे अत्यंत गरजेचे असून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थी हिताच्या मागणीचा विचार होऊन पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची मुदत दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.