दामिनी पथकाकडून देवपुरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:34 IST2019-07-16T12:34:06+5:302019-07-16T12:34:37+5:30
टवाळखोरांची उडाली धांदल : समज देवून दिले सोडून

दामिनी पथकाकडून देवपुरात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील जयहिंद चौक सध्या संवेदनशील होत आहे़ याठिकाणी टवाळखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परिणामी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणींना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे़ देवपुरातील जयहिंद चौकात एका टवाळखोरांकडून तरुणीची छेड काढण्याचा प्रकार होत असतानाच अचानक दामिनी पथकाने याठिकाणी धडक दिली आणि त्या टवाळखोराला पकडले़ त्याची प्राथमिक चौकशी करुन त्याला पोलिसी समज देवून सोडून देण्यात आले़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली़ या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत़