धुळ्यात दामिनी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:52 IST2019-04-09T11:52:06+5:302019-04-09T11:52:40+5:30

सायबर कॅफे : ६ जण ताब्यात, त्यात ३ मुलींचा समावेश

Damani Damani squad operation in Dhule | धुळ्यात दामिनी पथकाची कारवाई

धुळ्यात दामिनी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील एका सायबर कॅफेवर पोलिसांच्या दामिनी पथकाने छापा टाकून ३ तरुण आणि ३ तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ ही कारवाई मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली़ सायबर कॅफेवर सध्या तरुण-तरुणींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ यात काही गैरप्रकारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई होत असते़ देवपुरातील एका सायबर कॅफेवर तरुणांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळाली़ माहिती मिळताच पथकाने छापा टाकला़ ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण-तरुणींची चौकशी सुरु झाली आहे़ ते कोणत्या कामासाठी आले होते आणि त्यांचा नेमका उद्देश काय, यासह अनुषंगिक बाबींची चौकशी सुरु झाली आहे़ 

Web Title: Damani Damani squad operation in Dhule