एक्सपे्रस कॅनॉल ओसंडतोय़़़ शेतात पाणी गेल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:17 IST2020-07-25T22:16:57+5:302020-07-25T22:17:26+5:30
चौगाव शिवार । पाणी आल्याने काही शेतकरी समाधानी तर काहींकडून नाराजी

एक्सपे्रस कॅनॉल ओसंडतोय़़़ शेतात पाणी गेल्याने नुकसान
कुसुंबा : धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडचणीच्या काळात धुळे शहराला पाणी देणारा एक्सपे्रस कॅनॉल ओसंडून वाहत आहे़ त्यामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झाला असलातरी काही शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़
गेल्या दोन ते तीन दिवसापासून चौगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व नाले तुडुंब वाहत आहेत. नाल्या काठच्या घरांना ग्रामपंचायतीने सूचना दिल्या आहेत़ धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच शेती शिवारात ही अनेक शेतकºयांच्या शेतात नाल्यांचे पाणी गेल्याने पेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे़ त्यात विशेषत: बाजरी, ज्वारी, कापूस, भुईमूग, मका इत्यादी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे़ भरमसाठ पाऊस झाल्याने तसेच एक्सप्रेस कॅनॉलवरील चौगाव धरण गेल्या दीड महिन्यापूर्वी ९० ते ९५ टक्के भरला होता़ परंतु गुरुवार, शुक्रवारी झालेल्या पावसाने तो १०० टक्के भरला असून धरणाच्या हिरासन नाला व एक्सप्रेस कॅनॉल ओसंडून वाहत आहे. चौगाव धरण ओव्हरफ्लो झाला असून त्याचबरोबर आजूबाजूचे छोटे-मोठे नाले ओसंडून वाहत आहेत़
धुळे तालुक्यातील चौगाव शेती शिवारातून एक्सप्रेस कॅनॉल हा जात असल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने काही शेतकºयांच्या शेतीला फायदा झाला तर काही शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले़ त्यात शेतीचे पिक पाण्यात वाहुन गेले असून नुकसान झालेल्या शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.
शेतकºयाचे नुकसान
एक्सप्रेस कॅनॉलला लागुन चौगाव शिवारातील भाईदास लुका पवार यांची शेती असून ती एक एकर इतकी आहे़ त्यात बाजरीची पेरणी करण्यात आलेली आहे़ मुसळदार पावसामुळे कॅनॉलला बºयापैकी पाणी आले आहे़ त्यात या शेतातील संपुर्ण बाजरी पाण्यात वाहुन गेली आहे़ परिणामी या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाईदास पवार यांच्या कुटुंबात ते स्वत: आणि त्यांची पत्नी व दोन मुले आहे असा परिवार आहे.
कॅनॉलला धोका, ही अफवाच
एक्सप्रेस कॅनॉल हा भरल्यामुळे पाणी आता बाहर ओसंडू लागल्याचे समोर आले आहे़ हा कॅनॉल फुटेल अशी अफवा होती़ पण, असे काही होणार नाही असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वास दराडे यांनी कळविले आहे़