धरणाच्या दुरुस्तीचे २० लाखांचे काम अवघे २० हजारांत पूर्ण; उर्वरित पैशांवर डल्ला मारण्याचा डाव परिसरातील शेतकऱ्यांनी उधळून लावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:23+5:302021-06-22T04:24:23+5:30
यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे व या धरणाची जबाबदारी असणारे अभियंते मोहन भदाणे यांना विचारले असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. ...

धरणाच्या दुरुस्तीचे २० लाखांचे काम अवघे २० हजारांत पूर्ण; उर्वरित पैशांवर डल्ला मारण्याचा डाव परिसरातील शेतकऱ्यांनी उधळून लावला
यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे व या धरणाची जबाबदारी असणारे अभियंते मोहन भदाणे यांना विचारले असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर काम अजून करायचे बाकी आहे, अशी सारवासारव केली.
तर कार्यकारी अभियंता नागेश व्हट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित अभियंत्याला माहिती देण्याचे सांगतो, असे सांगितले. त्यानंतर या धरणाचे अंदाजपत्रक किती आहे व कोणकोणते काम करण्याचे अंदाजपत्रक होते, हे समजून आले आहे. अशाच पद्धतीने अनेक धरणांच्या दुरुस्तीच्या कामांची बिले काढण्यात येऊ शकतात. हे धरण जर दुरुस्त झाले नाही, तर त्याचा मोठा धोका खालील गावांना निर्माण होणार आहे. काम न करता पैसे काढून घेण्याची हिंमत करणाऱ्या या अभियंत्याची त्वरित चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आता वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.