हरविलेला अनास बागवान मुस्कान पथकाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:07 IST2019-12-13T22:07:22+5:302019-12-13T22:07:46+5:30
दोंडाईचा येथील घटना, पेट्रोलिंग करीत असताना मुलगा सापडला

हरविलेला अनास बागवान मुस्कान पथकाच्या ताब्यात
धुळे : दोंडाईचा पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना १२ वर्षाचा मुलगा हरविलेल्या स्थितीत आढळून आला़ त्याची सहानुभूतीपुर्वक विचारपूस केल्यानंतर त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले़ ही कारवाई मुस्कान पथकाने केली़
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातंर्गत मुस्कान पथक सज्ज करण्यात आले आहे़ या पथकामार्फत हरविलेल्या महिला व मुले यांचा शोध घेतला जातो़ त्यानुसार, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पथक कामगिरी करीता माहिती काढून पेट्रोलिंग करीत असताना मोनाली चौफुली येथे अनास रजा शरीफ बागवान हा १२ वर्षाचा मुलगा एका चहाच्या दुकानाजवळ भेदरलेल्या अवस्थेत बसलेला होता़ त्याच्या जवळ जावून पथकाने त्याची माहिती घेतली आणि त्याच्या पालकाचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन त्याला केले़ या कारवाईचे कौतुक होत आहे़