सीटीस्कॅनची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:50+5:302021-05-05T04:58:50+5:30

बाजारात गर्दी धुळे : सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहत असल्याने आग्रा रोड, पाचकंदील बाजारात गर्दी होत ...

CTscan facility | सीटीस्कॅनची सुविधा

सीटीस्कॅनची सुविधा

बाजारात गर्दी

धुळे : सकाळी ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहत असल्याने आग्रा रोड, पाचकंदील बाजारात गर्दी होत आहे. शहरी तसेच ग्रामीण बाजारकरूंची संख्या वाढली आहे.

लसीकरणाला रांगा

धुळे : येथील जिल्हा रुग्णालयात लसीकरणाला गर्दी होत आहे. लांबच लांब रांगा लागत आहेत. लसीकरणासाठी आलेले नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत. रुग्णालयाने शिस्त लावण्याची गरज आहे.

लाॅकडाऊनची चर्चा

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी शेकडोने वाढत आहे. प्रशासनाने कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. शासनानेदेखील लाॅकडाऊनचा इशारा दिला आहे. सर्वत्र तशी चर्चा आहे.

ओट्यांवर बैठक

धुळे : बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने दुकानांच्या मोकळ्या ओट्यांवर गर्दी होत आहे. दुकानाचे मालक, कामगार किंवा इतर नागरिक टाइमपास म्हणून येऊन बसत आहेत. सुदैवाने मास्कचा वापर होत आहे.

Web Title: CTscan facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.