थाळनेर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:39+5:302021-05-17T04:34:39+5:30
येथील केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू केली. लस घेण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागतात. ग्रामीण रुग्णालयात उन्हापासून बचावासाठी व पिण्याच्या ...

थाळनेर आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी
येथील केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू केली. लस घेण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागतात. ग्रामीण रुग्णालयात उन्हापासून बचावासाठी व पिण्याच्या पाण्याची कुठलीही सोय केली नसल्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी तासन्तास कडक उन्हातच उभे राहावे लागत आहे. दिवसभर उभे राहूनही लस संपल्याचे कारण सांगितले जाते. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे दिसून येतो.
थाळनेर येथील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी होत असल्याची तक्रार गावातील लोकप्रतिनिधींकडे नागरिकांनी केली. त्यानंतर पंचायत समिती सदस्य विजय बागुल, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाठ, पत्रकारांनी व नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. के. के. राजपूत हे गैरहजर होते. त्यांच्याशी विजय बागुल यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व लसीकरणबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य भैरवी शिरसाठ, पंचायत समिती सदस्य विजय बागुल यांनी सांगितले.