धान्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:52+5:302021-07-01T04:24:52+5:30

खड्डे बुजवा धुळे : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या आधी ...

Crowd for grain | धान्यासाठी गर्दी

धान्यासाठी गर्दी

खड्डे बुजवा

धुळे : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजविले नाहीत तर या रस्त्यांची अधिक दुरवस्था होईल.

रस्त्यावर पार्किंग

धुळे : येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमाेर रस्त्यावरच दुचाकी पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकदा वाहतूक खाेळंबते. काही वेळा अधिकाऱ्यांची वाहनेदेखील अडकतात.

शाैचालय बांधावे

सोनगीर : तालुक्यातील सोनगीर येथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या गावात महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक सुलभ शाैचालय नाही. सुलभ शाैचालय नसल्याने उघड्यावर जावे लागते. त्यामुळे महिलांचे हाल होतात.

ढगाळ वातावरण

धुळे : शहराच्या नभांगणात ढग दाटून आले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस झाला नाही. सायंकाळी तुरळक पावसाचा शिडकाव झाला. काही भागात पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण अशी स्थिती आहे.

Web Title: Crowd for grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.