शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 7:57 PM

हातातोंडाशी घास गेला वाया : ज्वारी, कपाशीचे पिके भुईसपाट, पंचनामे करून त्वरित भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही, तोच शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पुन्हा एकदा खरिपाच्या पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.कापडणे (ता. धुळे)धुळे तालुक्यातील कापडणे गावासह कौठळ गावात १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजे नंतर विजांचा कडकडासह वादळी पाऊस झाला. यामुळे खखरीप हंगामातील कपाशी बाजरी मका सर्वत्र डोलदार पिके आडवे पडून जमीनदोस्त झालीत शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.यंदाच्या खरीप हंगामात वेळेच्या आधीच अर्थात एक जून रोजी धुळे तालुक्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर जून महिन्यात तब्बल पंधरा ते सोळा दिवस मध्यम जोरदार पाऊस झाला. आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात पावसाने मात्र जास्तच कहर केला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील वादळीवाºयासह पाऊस झाला. ४ व ५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालो. यातून सावरत नाही, तोच १९ रोजी रात्री पुन्हा रात्री दोन ते तीन तास वादळ वाºयासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील सर्वत्र डोलदार काढणीवर आलेले शेती पिके अतिवृष्टीमुळे व वादळामुळे आडवी पडून जमीनदोस्त झालेली आहेत.मोहाडी प्र डांगरी (ता.धुळे)येथे शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फायदा कमी नुकसानच जास्त झाले शेतीचा हंगाम ऐन भरात असतांना ,अचानक आलेल्या परतीच्या पावसाने मोहाडी सह परिसरातील गावांमध्येही शेतकº्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात वेचण्यासाठी तयार असलेल्या बागायती तसेच कोरडवाहू कापूस झाडावर ओला होऊन बोंडे अक्षरश: लोंबकळून जमीनदोस्त झाली. तसेच काढणीला आलेला भुईमुगाच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पक्व झालेल्या शेंगांचे आता कोंब फुटूनवर येऊ लागतील. तिळीचे पीक पण पाण्यातच गेले आहे. आधीच मूग, उडीद आदी कडधान्य खराब झाले.चारा पिकांचे प्रचंड नुकसानझाले आहे. बाजरी पण काळवंडली असून ज्वारीपण त्याच मार्गावर आहे.आता बरे होण्याच्या मार्गावर असलेले शेतशिवार रस्ते अजून एक महिना आता दुरुस्त होणार नाहीत.त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरित प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी बांधवाना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा.दुसाणे (ता.साक्री)साक्री तालुक्यातील दुसाणे व आजूबाजूच्या परिसरात १९ सप्टेंबर रोजी रात्री वादळी वाº्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यात शेतकº्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. काही शेतकº्यांचा अगदी तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झाला. यात कांदा,कापूस, ज्वारी,बाजरी या पिकांचे खूप नुकसान झाले.बाजरी व ज्वारी काढणीची वेळ आली होती. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकº्याची एकच तारांबळ उडाली. कापूस वेचणीच्या कामाला वेग आला होता, परंतु सर्व कापूस देखील गळून गेला. उर्वरित कापसाच्या झाडावरचे संपूर्ण बोंड वादळामुळे गळून पडली आहेत. तसेच फळबागेत पपई, अ‍ॅपल बोर , ऊस , केळी याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकº्याला तारणहार ठरणारे गवार पिकाच्या शेवटच्या तोडणी बाकी होत्या. ते पीक देखील पूर्णत: वाया गेले. तर या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस शनिवारी झाला. या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे तार तुटून पडल्यामुळे परिसरात वीज पुरवठा खंडीत झालेला होता.दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.