धुळे : येथील स्टेशन रोडवर मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात नरेंद्र भटू पाटील रा़ मोहाडी हा तरुण ठार झाला तर परेश पोपट वैराळे हा जखमी झाला़ याप्रकरणी परेश वैराळे याच्या फिर्यादीवरुन ट्रकचालक फिरोज सुलेमान रनपरीया याच्याविरुध्द धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भरधाव ट्रकने अॅपेरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला होता़
अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 22:31 IST