एकाला लुटणाऱ्या तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 22:07 IST2021-01-02T22:06:48+5:302021-01-02T22:07:15+5:30
बाळापूर येथील घटना

एकाला लुटणाऱ्या तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा
धुळे : तालुक्यातील बाळापूर शिवारात एकास बेदम मारहाण करुन लुटल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तीन जणांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा धुळे तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
विनोद देविदास पाटील (३७, गणपती मंदिराजवळ, वरखेडी रोड, बाळापूर ता. धुळे) याने धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, काहीही कारण नसताना रविंद्र अमृत पाटील, वाल्मिक नारायण पाटील, बापू नारायण पाटील (सर्व रा. बाळापूर ता. धुळे) या तिघांनी मारहाण केली. यात वाल्मिक याने लोखंडी रॉडने तर बापूने लाकडी काठीने मारहाण केली. तसेच वाल्मिक पाटील याने त्याच्या शर्टाच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. ही घटना ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर जखमी झालेल्या विनोद पाटील याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात विनोद देविदास पाटील याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रविंद्र अमृत पाटील, वाल्मिक नारायण पाटील, बापू नारायण पाटील या तिघांविरुध्द भादंवि कलम ३९४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.