रावलांच्या फॉर्महाऊसमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गोटेंविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:42 IST2020-12-12T22:32:36+5:302020-12-12T22:42:50+5:30
कोणालाही शिवीगाळ , दमदाटी केलेली नाही - गोटेंचे म्हणणे

रावलांच्या फॉर्महाऊसमध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गोटेंविरुध्द गुन्हा
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे तापी नदीकाठी असलेल्या आमदार जयकुमार रावल यांच्या फॉर्महाऊसमध्ये शुक्रवारी दुपारी बेकायदेशीर प्रवेश करुन कर्मचाऱ्यांना धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांच्यासह ४ ते ५ जणांविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी रावलांच्या कर्मचाऱ्याने शनिवारी सकाळी फिर्याद दाखल केली.
शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास अनिल गोटे हे ४ ते ५ जणांसोबत बेकायदेशीररित्या फॉर्महाऊसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना विरोध केला असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ केली. असे टाकरखेडा येथील फॉर्महाऊसचे कर्मचारी प्रतापसिंग भिमसिंग गिरासे रा. आरावे ता. शिंदखेडा यांनी आपल्या फियार्दीत म्हटले आहे.
रावलांनी केलेले अतिक्रमण
पाहण्यासाठी गेलो : गोटे
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे जयकुमार रावल यांनी केलेले अतिक्रमण पाहण्यासाठी गेलो होतो. कोणालाही शिवीगाळ केलेली नाही, कोणालाही धमकी दिलेली नाही अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी लोकमतला दिली.