घरावर दगडफेक, मारहाण आठ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:06+5:302021-02-05T08:45:06+5:30
दोंडाईचा येथील गरीब नवाज कॉलनीतील घरावर दगड, विटा व लाठ्या काठ्या घेऊन घरावर चालून येऊन घरावर दगडफेक केली. वडील ...

घरावर दगडफेक, मारहाण आठ जणांविरुद्ध गुन्हा
दोंडाईचा येथील गरीब नवाज कॉलनीतील घरावर दगड, विटा व लाठ्या काठ्या घेऊन घरावर चालून येऊन घरावर दगडफेक केली. वडील मोहन रामभाऊ कोळी, भाऊ भूषण कोळी यांना लाकडी दांडक्यांनी डोक्यावर, पोटावर, छातीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. घराचा खिडक्यांची काच फोडली. शिवीगाळ करून जीवे ठार मारहाण केल्याची फिर्याद हरेश मोहन कोळी यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे़
हरेश कोळी यांचा फिर्यादीनुसार कौसर खाटिक, सिराजउल, अज्जू खाटिक, सलमान शहा, अजहर, नुरा पिंजारी, असरार, सलीम भट्टी या आठ संशयित आरोपींविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक दिनकर पाटील करत आहेत. दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़