पोळानिमित्त मिरवणूक १२ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:37 IST2020-08-20T22:36:47+5:302020-08-20T22:37:08+5:30

दोंडाईचा : बंदी असतानाही पुढाकार

Crime against 12 persons in connection with the procession | पोळानिमित्त मिरवणूक १२ जणांविरुध्द गुन्हा

पोळानिमित्त मिरवणूक १२ जणांविरुध्द गुन्हा

धुळे : पोळा निमित्त निघणाऱ्या बैलांच्या मिरवणुला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी असतानाही गर्दी जमवून बिनधास्तपणे पुढाकार घेणाºया १२ जणांविरुध्द दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून कायदेशीर आदेशाचे उल्लंघन करुन कोणत्याही कारणाशिवाय लोकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे माहित असूनही देखील मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोंडाईचा नगरात राऊळनगर ते मांडळ रोडावरील मारुती मंदिराजवळ बैलांची मिरवणुक काढण्यात आली़ यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती़ आदेशाचे पालन न करता तोंडाला मास्क देखील लावलेले नव्हते़ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता़ म्हणून पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार प्रेम प्रकाश साठे, वासुदेव सुनील निष्काळजे, गणेश गजानन निष्काळजे, नितीन गजानन निष्काळजे, अजय अशोक इशी, सागर चंद्रकांत म्हस्के, हर्षल आनंदा महाले व अन्य जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला़ वासुदेव जगदाळे तपास करत आहे़

Web Title: Crime against 12 persons in connection with the procession

टॅग्स :Dhuleधुळे