कर्जमुक्तीचे श्रेय केवळ शिवसेनेचेच - संजय राऊत

By Admin | Updated: June 12, 2017 12:06 IST2017-06-12T12:06:26+5:302017-06-12T12:06:26+5:30

दोंडाईचा येथे शिवसेनेचा शेतकरी मेळावा.

The credit worthiness is only for Shivsena - Sanjay Raut | कर्जमुक्तीचे श्रेय केवळ शिवसेनेचेच - संजय राऊत

कर्जमुक्तीचे श्रेय केवळ शिवसेनेचेच - संजय राऊत

 आॅनलाईन लोकमत

दोंडाईचा,दि.१२ :  शिवसेनेमुळेच राज्यातील  शेतकरी रस्त्यावर उतरला. त्यात शेतकºयांना मिळालेल्या कर्जमुक्तीचे श्रेय दुसºया कोणाचे नाही. ते केवळ शिवसेनेचे आहे. हे शिवसैनिकांनी जिल्हाभरातील गावागावात जाऊन सांगावे, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी येथे केले.
दोंडाईचा शहरातील सौरभ मंगल कार्यालयात शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके,  जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, पालकमंत्री दादा भुसे, महेश मिस्त्री, अतुल सोनवणे, शानाभाऊ सोनवणे आदी उपस्थित होते. खासदार राऊत पुढे म्हणाले, की  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्त सांडणाºया शिवसैनिकांचा आदर्श ठेवला पाहिजे. तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शिवसेनेला विजय हा जिद्दीनेच मिळतो. आपले नेते केवळ उध्दव ठाकरे आहेत, याची जाण कार्यकर्त्यांनी ठेवावी. 

Web Title: The credit worthiness is only for Shivsena - Sanjay Raut