बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 21:54 IST2020-12-07T21:53:28+5:302020-12-07T21:54:14+5:30
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथे डाबरी शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गाई ठार झाली आहे. येथील राजेंद्र रघुनाथ ...

dhule
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथे डाबरी शिवारात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गाई ठार झाली आहे.
येथील राजेंद्र रघुनाथ नेरे यांच्या शेतात रविवारी मध्यरात्री बिबट्याने गाईला ठार करून फस्त केले. सदर शेतकरी नेरे हे सकाळी दूध घेण्यासाठी शेतात गेले असता त्यांना गोठ्या बांधलेली गाय काही अंतरावर मृत अवस्थेत दिसली या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश नेरे, दीपक ठाकरे यांनी वन विभागात दिली.
वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी एल. आर. वाघ यांनी या घटनेचा पंचनामा केला. हल्यात ठार झालेली गाय २५ ते ३० हजार रूपये किमतीची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वन विभागाने आणि पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांचे प्रबोधन करून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण घ्यावे आणि बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी राकेश नेरे, प्रफुल नेरे, मंगेश नेरे, नानाभाऊ नेरे, सुरेश नेरे, राजेंद्र नेरे, दीपक ठाकरे आदी शेतकऱ्यांनी केली.