विषबाधेमुळे गायीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST2021-08-24T04:40:14+5:302021-08-24T04:40:14+5:30
२ ऑक्टोबर २०२० रोजी दोन गायी चोरीला गेल्या. यापूर्वीदेखील एक गाय चोरीला गेली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या वारंवार होत ...

विषबाधेमुळे गायीचा मृत्यू
२ ऑक्टोबर २०२० रोजी दोन गायी चोरीला गेल्या. यापूर्वीदेखील एक गाय चोरीला गेली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या वारंवार होत असलेल्या गायी चोरीचा अद्याप पोलिसांनी छडा लावला नाही व चोरीस गेलेल्या गायींची शेतकऱ्याला आजतागायत भरपाईही मिळाली नाही. तीन गाई चोरीस गेलेल्या घटनेचे दुःख शेतकरी कुटुंब विसरत नाही तोवर पुन्हा सोमवारी २३ रोजी सकाळी गायीचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे गायीचा मृत्यू झाला, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मच्छिंद्र बोरसे शेतकरी कुटुंबाने मृत्यू पावलेल्या गायीची विधीवत पूजा करून पांढरे कापड टाकून बैलगाडीतून नेऊन गावाच्या धनुर रोडाकडे मृत्यू पावलेल्या गायीला पुरले आहे. याप्रसंगी सर्व बोरसे शेतकरी कुटुंबाच्या सदस्यांच्या महिला पुरुषांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.