कापूस विमा रक्कम मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 09:24 PM2020-07-16T21:24:08+5:302020-07-16T21:24:27+5:30

कुणाल पाटील : बँकेच्या खात्यात जमा होणार

Cotton insurance amount sanctioned | कापूस विमा रक्कम मंजूर

dhule

Next

धुळे : सन २०१९-२० वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस विमा रक्कम मंजूर झाली आहे.सदर विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दिली़
गेली अनेक महिने विमा रक्कमेच्या प्रतिक्षेत असलेल्या धुळे तालुक्यासह जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या काळात दिलासा मिळाला आहे. कापूस उत्पादक शेतकºयांच्या प्रलंबित प्रश्नासाठी कुणाल पाटील यांनी पाठपुरवा केला होता़
ओला दुष्काळ, कोरोना, टाळेबंदी यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आर्थिक आधाराची गरज होती. मागील खरीप हंगामात कापूस उत्पादकांनी विमा काढला होता़ मात्र प्रत्यक्षात शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब होत होता. कापूस पिक विमा मिळावा म्हणून शेतकºयांनी आ. पाटील यांची भेट घेवून मागणी केली होती. जूलै २०१९ मध्ये शेतकºयांनी हेक्टरी १८०० रुपये विम्याचा हप्ता भरलेला होता.
आमदार पाटील यांनी गेल्या मंगळवारी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केली़ जिल्हाधिकाºयांनी विमा कंपनीच्या अधिकाºयांना त्वरीत रक्कम अदा करण्याच्या सूचना दिल्या़ विमा कंपनीने रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक कागदपतंची पुर्तत: करण्याचे काम सुरू केले आहे़ शेतकºयांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होईल़

Web Title: Cotton insurance amount sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे