पत्र्यांच्या शेडवर मनपाचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:47+5:302021-07-01T04:24:47+5:30
गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून ...

पत्र्यांच्या शेडवर मनपाचा हातोडा
गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून मास्क व सोशल डिस्टंन्सिंग न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. मात्र, महिन्याभरापासून काेरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आता अतिक्रमण निर्मूलन पथक सक्रिय झाले आहे.
मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमाक १२ मधील हाजी नगर तसेच जनता सोसायटी नाल्यामधील ४ ते ५ पत्र्याचे शेड व मातीचे घर बांधले होते. यामुळे पावसाळ्यात नाल्यात पाणी तुंबल्याने दोन ते तीन हजार नागरिकांच्या घरात पाणी जात होते. भविष्यात पाण्यामुळे प्राणहानी व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या भागातील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाशी काही नागरिकांनी मज्जाव केला. मात्र, पोलिसांकडून समजूत काढण्यात आल्याने जेसीबीच्या मदतीने येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले.