CoronaVirus News: धुळ्यात आणखी ४५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या हजाराच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 21:29 IST2020-06-28T21:29:15+5:302020-06-28T21:29:30+5:30
धुळे महानगरपालिकेच्या पॉलिटेक्निक कॉलेज येथील कोवीड केअर सेंटरमधील २५ अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

CoronaVirus News: धुळ्यात आणखी ४५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या हजाराच्या पार
धुळे: आणखी ४५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे़ त्यामुळे धुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला आहे.
हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील अहवालांपैकी साक्री तालुक्यातील छाईल येथील चार आणि धुळे शहरातील भाईजी नगर दोन, लोकरे नगर दोन, शिवाजी नगर एक, गव्हर्नमेंट सर्वंट कॉलनी वाडीभोकर रोड एक आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील तीन अशा नऊ रुग्णांचे अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटीव्ह आले़ सायंकाळी सहा वाजता हे अहवाल प्राप्त झाले. त्यानंतर रात्री आठ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार, ३२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली.
जिल्हा रुग्णालयातील ४४ अहवालांपैकी २० अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ त्यात पिंपळनेर येथील दोन, वणी ता़ धुळे दोन, स्रेह नगर दोन, अविष्कार कॉलनी आठ, चितोड नाका दोन, मोगलाई दोन, कोंडाजी व्यायाम शाळा एक आणि वेल्हाणे ता़ धुळे येथील एक असे वीस अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील आठ अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पाचही रुग्ण करवंद येथील रहिवासी आहेत.
धुळे महानगरपालिकेच्या पॉलिटेक्निक कॉलेज येथील कोवीड केअर सेंटरमधील २५ अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एकता नगरातील दोन आणि बालाजी नगरातील एका रुग्णाचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील भाडणे येथील कोवीड केअर सेंटरमधील दहा अहवालांपैकी चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ त्यात मालपूर येथील एक, महात्मा फुले चौक साक्री एक, कुंभारवाडा एक आणि जैताने डांगरवाडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे़
धुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार ११ झाली असून त्यापैकी ४८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़ ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ ४६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.