मनोरुग्णांना बसला कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:59+5:302021-02-05T08:44:59+5:30
मनोरुग्णांमध्ये कुठला त्रास वाढला कोरोनामुळे आपण करीत असलेली नोकरी हातातून गेली. आपल्या परिवाराचे पुढे कसे होणार, मला पुन्हा नोकरी ...

मनोरुग्णांना बसला कोरोनाचा फटका
मनोरुग्णांमध्ये कुठला त्रास वाढला
कोरोनामुळे आपण करीत असलेली नोकरी हातातून गेली. आपल्या परिवाराचे पुढे कसे होणार, मला पुन्हा नोकरी लागून आपले घर चालविले जाणार का, यासह अनुषंगिक बाबींवर सारखा विचार करून अनेकांनी आपल्या मनावरील संतुलन बिघडवून घेतले. नेहमीपेक्षा अधिक विचार करून त्यांच्यावर ही वेळ आली आहे. कोरोना सुरू होण्यापूर्वी मनोरुग्णांची संख्या असली तरी त्याच्यात कोरोनामुळे संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर बऱ्याच जणांवर उपचार सुरू असलेतरी त्यांना रुग्णालयात भरती न करून घेता त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे मानसिक संतुलन बिघडवून घेणाऱ्यांची संख्या कोरोना काळापूर्वीच्या तुलनेत निश्चित वाढलेली दिसत आहे. त्यात प्रामुख्याने मानसिक ताणतणाव हेच सध्या तरी या काळात प्राथमिक कारण असल्याचे समोर येत आहे. याशिवाय मनाचे संतुलन बिघडवून घेण्याचे अनेक कारणे असू शकतात. ते रुग्णाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते.
- डॉ. प्रवीण साळुंखे, मानसोपचार तज्ज्ञ, धुळे.