कोरोना योद्ध्यांची रथावरून मिरवणूक : बळसाणे गावात सेवापूर्ती शिक्षकांचा निरोप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:07+5:302021-08-20T04:42:07+5:30
सत्कारमूर्ती प्राचार्य के.यू. सूर्यवंशी, उपप्राचार्य पी.एन. पाटील, शिक्षक आर.बी. पटेल, एन.एस. पाटील व पोस्टमन पंढरीनाथ पवार यांना सपत्नीक सन्मानचिन्ह, ...

कोरोना योद्ध्यांची रथावरून मिरवणूक : बळसाणे गावात सेवापूर्ती शिक्षकांचा निरोप समारंभ
सत्कारमूर्ती प्राचार्य के.यू. सूर्यवंशी, उपप्राचार्य पी.एन. पाटील, शिक्षक आर.बी. पटेल, एन.एस. पाटील व पोस्टमन पंढरीनाथ पवार यांना सपत्नीक सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. यशवंत पाटील यांच्यासह आरोग्यसेविका, आशासेविका, आरोग्यसेवक व जिल्हा परिषदेचे शिक्षकांसह सफाई कामगार आदींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. बळीराम आढाव यांनी केले, तर आभार प्रा. कैलास न्याहळदे यांनी मानले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी उपसरपंच महावीर जैन, ग्रामपंचायत सदस्य देवीदास धनुरे, अवचित धनगर, इंद्रसिंग गिरासे, प्रा. भूषण हालोरे, ध्यानाबाई माळचे, मीराबाई खांडेकर, जनाबाई मासुळे, कल्पनाबाई ईशी, लीलाबाई हालोरे, मलेखाबी शेख, रमणबाई चव्हाण, हिराबाई मोरे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.