जिल्हा रुग्णालयातील कोरोना योध्दांचा सत्कारराष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:37+5:302021-06-18T04:25:37+5:30
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ महेश भडांगे, अधिक्षक डॉ. अश्विनी भामरे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, ...

जिल्हा रुग्णालयातील कोरोना योध्दांचा सत्कारराष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ महेश भडांगे, अधिक्षक डॉ. अश्विनी भामरे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. अभय शिनकर, डॉ. राजे, डॉ. रवी सोनवणे, डॉ. दिनेश दहिते, डॉ. प्रियंका म्हसणे, डॉ. प्रिंयका शिंदे, डॉ. सागर चव्हाण, डॉ. स्वप्नील पाटील, सुवर्णा सूर्यवंशी, दिपाली मोरे, अधिपरीचारिका प्रतिभा घोडके, ज्योती दुरले, सुशील जिरे, अविनाश गायकवाड, कक्ष सेवक मयुरी सोमवंशी, चंद्रमुखी पवार, मीरा कांदे, सुवर्णा चव्हाण यांचा गाैरव झाला. तसेच धुळे शहर पोलीस वाहतूक शाखेच्या निरीक्षक संगीता राऊत, उपनिरीक्षक रामदास जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरअध्यक्ष रणजितराजे भोसले होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष किरण शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओ.बी.सी सेल प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरक्षक गिरीश भामरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक धुळे जिल्हा महिला अध्यक्ष शकीला बक्ष, जिल्हा सहकार विभाग राजेंद्र सोलंकी, ओबीसी सेल धुळे शहर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कुंदन पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, संजय माळी, उपाध्यक्ष विजय पाटील, विजय लहामगे, शकील खाटीक, संघटक अतुल अहिरराव, श्रीकांत नेरकर, रुपेश विभांडीक आदी उपस्थित होते.