कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:58+5:302021-06-03T04:25:58+5:30

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर झाले होते. नियमांची ऐशीतैशी झाल्यानेच कोरोनाची दुसरी लाट आल्याचे ...

Corona hasn't gone yet; If these five mistakes are repeated, the third wave is inevitable ...! | कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ... !

कोरोना अद्याप गेला नाही; या पाच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ... !

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर झाले होते. नियमांची ऐशीतैशी झाल्यानेच कोरोनाची दुसरी लाट आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर त्यावेळीच आणखी काही दिवस निर्बंध शिथिल झाले नसते किंवा लोकांनी नियम पाळले असते, तर दुसरी लाट आली नसती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पहिल्या लाटेपेक्षा अधिक नुकसान केले आहे. पहिल्या लाटेनंतर विविध राजकीय सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना मोठी गर्दी झाली होती. तसेच लग्न समारंभांना दणक्यात सुरुवात झाली होती. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तसेच लसीकरणाची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. मात्र. लसीकरण अजूनही धिम्या गतीनेच सुरू आहे.

१ - लग्न समारंभ कमी लोकांच्या उपस्थितीत करणे गरजचे आहे.

२ - रुग्ण कमी झाले तरी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.

३ - इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची नियमितपणे कोरोना चाचणी करावी.

४ - धिम्या गतीने सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची गती वाढवावी.

५ - बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

पालिकेच्या पथकांची असेल नजर -

१ - कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. तसेच व्यापारी संकुले दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२ निर्बंध शिथिल झाले असली तरीही नियम मोडणाऱ्या नागरिकांवर महानगर पालिकेच्या पथकांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे व्यावसायिक व ग्राहक दोघांनाही कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागतील.

३ महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देखील पथक निर्माण करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी करणाऱ्या नागरिकांची पथकाकडून कोरोना चाचणी केली जात आहे.

४ - आरोग्य पथकात ५ डॉक्टर, १० परिचारिका व सहा तंत्रज्ञांचा समावेश आहे. दररोज ४०० ते ५०० चाचण्या केल्या जातात. याआधी अँटिजन चाचणी काण्यात येत होती. आता मात्र आरटीपीसीआर चाचणी केली जाते.

५ - निर्बंध शिथिल झाल्यामुळे बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. त्या पार्शवभूमीवर पालिकेचे पथक सक्रिय झाले आहे. नियम मोडणारे व्यापारी व ग्राहक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Corona hasn't gone yet; If these five mistakes are repeated, the third wave is inevitable ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.