बांधकामाचे साहित्य पिंपळनेर येथून चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:09 IST2018-02-25T12:09:06+5:302018-02-25T12:09:06+5:30

५१ हजारांचा मुद्देमाल : एकाविरुध्द गुन्हा

Construction material stolen from Pimpalner | बांधकामाचे साहित्य पिंपळनेर येथून चोरीस

बांधकामाचे साहित्य पिंपळनेर येथून चोरीस

ठळक मुद्देपिंपळनेर येथील घटनापोलिसात झाली नोंद चोरट्यांचा तपास सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : बांधकामासाठी ठेवण्यात आलेले लोखंडी मटेरियल चोरुन नेल्याची घटना साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावात घडली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ 
पिंपळनेर गावातील सटाणा रोडवर राहणारे कल्पेश सुभाष भदाणे या व्यापाºयाने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शुक्रवारी दुपारी देशशिरवाडे गावाच्या शिवारातील पोहा मिल येथून ५१ हजार ४२८ रुपये किंमतीचे लोखंडी साहित्य चोरुन नेण्यात आले़ ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ तसेच पिंपळनेर बाजारपेठेत वैभव प्रदीप कोठावदे यांच्या मालकीच्या दुकानातून २२० लिटर केरोसिनची टाकी सुध्दा चोरट्याने चोरुन नेली आहे़ या प्रकरणी कल्पेश भदाणे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून संशयित युसुफ मोहम्मद पटेल (रा़ पिंपळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

Web Title: Construction material stolen from Pimpalner