बांधकाम अभियंत्याला पत्नीने घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 22:20 IST2020-12-10T22:19:45+5:302020-12-10T22:20:02+5:30

वैभव नगरातील घटना : ४७ हजाराचा होता ऐवज

The construction engineer was beaten by his wife | बांधकाम अभियंत्याला पत्नीने घातला गंडा

बांधकाम अभियंत्याला पत्नीने घातला गंडा

धुळे : फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असताना आता चक्क स्वत:च्या पत्नीने गंडा घालून दागिन्यांसह रोख असा ४६ हजार ५१८ रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना वैभव नगर भागात घडली. ती परत येत नसल्याचे लक्षात येताच शहर पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांनी पत्नी विरोधात फिर्याद दाखल केली.
धुळे शहरातील वैभवनगरात मधुमंदार अपार्टमेंटमध्ये राहणारे सागर सतिष तायडे (३०) हे सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी ते पत्नी आणि आईसोबत वास्तव्यास आहे. त्यांची पत्नी ऋतुजा हिने लग्नातील दागिन्यांसह त्यांच्या आईने विश्वासाने तिला तात्पुरता स्वरुपात वापरण्यासाठी दिलेले ४६ हजार ५१८ रुपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मिनी पोत आणि माज्या पगारातील रोख १० हजार रुपये असा ऐवज घेऊन ती मला न सांगता निघून गेली आहे. ही घटना ११ एप्रिल आणि १७ जून २०१९ या दिवशी घडली आहे. तिने पुन्हा आपल्या घरी यावे यासाठी खूप प्रयत्न केले पण, तिच्याकडून कोणत्याही प्रकाचा प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येत आहे. लबाडीच्या इराद्याने ती पळून गेली आहे.
तिला परत आणण्याचे सर्व प्रयत्न संपल्यामुळे त्या सहायक अभियंत्याने शहर पोलीस ठाणे आपबिती कथन केली. त्यानुसार, स्वत:ची पत्नी ऋतुजा कमल राऊत (मायाकमल निवास, यशोधा नगर, अमरावती) हिच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सुनील पाठक घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: The construction engineer was beaten by his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे