शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डांगर मळ्यांमुळे वाळू साठ्याचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 11:58 IST

पांझरा नदी पात्र : इतरत्र वाळुचा सर्रास उपसा, नद्या पुन्हा होताहेत कोरड्याठाक, लोकसहभागाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पांझरा नदीच्या पात्रामध्ये शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी डांगर फळांची लागवड केली आहे़ आपल्या डांगर मळ्याचे रक्षण करण्यासाठी या शेतकऱ्यांनी रात्रंदिवस खडा पहारा सुरू केला आहे़ त्यामुळे या पट्ट्यांमध्ये वाळुचे देखील आपोआप संवर्धन होत आहे़गेल्या चार ते पाच वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे आणि वाळुच्या अमर्याद उपशामुळे पांझरा नदी कोरडीठाक झाली होती़ नदीच्या पात्रामध्ये केवळ दगडगोटे आणि माती शिल्लक होती़ धुळे शहरात तर केवळ वस्त्यांमधील सांडपाण्यामुळे नदीला गटारगंगेचे स्वरुप आले होते़ पाणी आणि वाळू नसल्याने डांगर फळांचे पिक घेण्यासारखी परिस्थिती नव्हती़ त्यामुळे चार ते पाच वर्षे शेतकºयांनी डांगराची लागवड करण्याचे टाळले़सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाला़ अक्कलपाडा प्रकल्पासह साक्री तालुक्यातील सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले़ या प्रकल्पांमधून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पांझरा नदीला तीन ते चार वेळा पूर आला़ शिवाय नदीच्या पात्रामध्ये सतत तीन महिने पाण्याचा प्रवाह कायम होता़ यामुळे पांझरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आली आहे़ कोरड्या झालेल्या नदीला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली आहे़ नैसर्गिकरित्या वाळुचे प्रमाण वाढले आहे़ या वाळुने पाणी धरुन ठेवले असून आजही नदी काही प्रमाणात प्रवाहीत आहे़ डांगराचे पीक घेण्यासाठी पोषक परिस्थिती आहे़त्यामुळे धुळे तालुक्यात पांझरा नदीच्या पात्रामध्ये काही शेतकºयांनी पारंपारीक पध्दतीने डांगराची लागवड केली आहे़ डांगर मळ्यांसाठी केलेल्या वाफ्यांमध्ये गुडगाभर वाळूचा थर आहे़ डांगर मळ्यांचे राखण करण्यासाठी शेतकºयांनी मळ्यांमध्ये झोपड्या बांधून तात्पुरता निवारा उभारला आहे़ डांगराची लागवड करणारे शेतकरी डोळ्यात तेल घालून आपल्या मळ्यांवर लक्ष ठेवत आहेत़ त्यांच्या या कामामुळे आपोआपच वाळु साठ्याचे देखील रक्षण होत आहे़ या मळ्यांच्या परिसरात वाळु माफियांची वाळु चोरी करण्याची हिंमत होत नाही़ पांझरेच्या पात्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी डांगराचे मळे आहेत त्या त्या ठिकाणी वाळुचा साठा जसाच्या तसा आहे़ तिच परिस्थिती बोरी आणि तापी नदीमध्ये देखील पहावयास मिळते़ बोरी आणि तापी पात्रामध्ये देखील डांगराचे मळे विकसीत करणाºया शेतकºयांकडून अप्रत्यक्षपणे वाळु साठ्याचे देखील संवर्धन होत आहे़ पर्यावरणाच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे़परंतु दुर्दैवाने याऊलट असलेली परिस्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने भयावह आहे़ नदी पात्रांमध्ये ज्या ठिकाणी डांगराचे मळे नाहीत त्या ठिकाणी वाळुचा अमर्याद उपसा सुरू आहे़ नद्यांना पुन्हा मोठमोठे भगदाड पाडले जात आहे़ पावसाळ्यात झालेला वाळुचा साठा चोरुन नेण्याचा सपाटा वाळु माफियांनी लावला आहे़पांझरा नदीमध्ये तर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दिवसाढवळ्या वाळू चोरी सुरू आहे़ शहराच्या बाहेरील नदी पात्रातूनच नव्हे तर शहरातून जाणाºया पात्रामध्ये देखील वाळुचा उपसा सुरू आहे़ ठिकठिकाणी गाळण्या लावल्या आहेत़ मजुरांकडून नदीमध्येच वाळू गाळून घेण्याचे काम केले जाते़ त्यानंतर बांधकामायोग्य बारीक वाळू ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहून नेली जाते़ पावसाळा संपल्यानंतर नदीची पाणी पातळी खालावल्यापासून वाळुचा अमर्याद उपसा सुरू आहे़महसूल विभागाकडून वेळोवेळी कारवाई होताना दिसते़ परंतु वाळू माफिया इतके मुजोर बनले आहेत की, ते आता कारवाई करणाºया महसूल कर्मचाºयांच्या अंगावर जावू लागले आहेत़ प्राणघातक हल्ले करु लागले आहेत़ परवा एका वाळू माफियाने जप्त केलेले ट्रॅक्टर तहसिलदारांच्या कस्टडीतून पळवून नेल्याची घटना ताजी आहे़ वाळू माफियांच्या या मुजोरीला महसूल अधिकारी आणि कर्मचारी देखील तितकेच जबाबदार आहेत़ आर्थिक लागेबांधे असल्याच्या चर्चा सर्रास होताना दिसतात़ कारवाई करताना महसूल विभागाने आकारलेल्या दंडाची पावती जणू वाळु चोरीचा परवाना ठरत आहे़ ही पावती दाखवली की वाळुची वाहतूक सुरू ठेवता येते, अशी परिस्थिती आहे़ त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे़पूर्वीच्या काळात डांगर मळ्यांचे प्रमाण फार होते़ त्यामुळे वाळू चोरी करणाºयांना शेतकरी अटकाव करायचे़ आता पुन्हा डांगराचे मळे दिसू लागले आहेत़ चिमठाण्यात बोरी पात्रामध्ये यंदा डांगर मळ्यांचे प्रमाण वाढल्याने आणि गावकºयांनी विरोध सुरू ठेवल्याने वाळू उपशाला मर्यादा आल्या आहेत़नदी पात्रांमधील वाळु वाचविण्यासाठी अशाच प्रकारे लोकसहभाग वाढत राहिला तर शासकीय लिलावानुसार गरजेपुरती वाळु दिली जाईल आणि पर्यावरणाचा होणारा ºहास थांबेल, अशा प्रतिक्रीया पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केल्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे