कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज धुळ्यात सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:33 IST2019-02-28T22:32:59+5:302019-02-28T22:33:45+5:30

एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर त्यांची जाहीर सभा

 Congress president Rahul Gandhi's rally today | कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज धुळ्यात सभा

dhule

धुळे : कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी शुक्रवार १ मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारी ३.३० वाजता शहरात एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
खासदार गांधी यांचे विमानाने दुपारी ३ वाजता सभेसाठी गोंदूर विमानतळावर आगमन होईल. त्यांच्या सोबत पक्षाचे महाराष्टÑ प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व राज्य विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
गोंदूर विमानतळावरून खासदार गांधी यांचे दुपारी ३.३० वाजता सभास्थळी आगमन होईल. ४.४५ वाजेपर्यंत सभा होईल. त्यानंतर ५.१० वाजता गोंदूर येथून ते विमानाने मुंबईकडे प्रस्थान करतील, अशी माहिती पक्षातर्फे गुरूवारी देण्यात आली.

Web Title:  Congress president Rahul Gandhi's rally today

टॅग्स :Dhuleधुळे