सर्वसमावेशक बुथ रचना व शक्ती केंद्रे भाजपाची बलस्थाने : अनुप अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 22:25 IST2021-02-06T22:25:38+5:302021-02-06T22:25:59+5:30
अनेकांची होती उपस्थिती

सर्वसमावेशक बुथ रचना व शक्ती केंद्रे भाजपाची बलस्थाने : अनुप अग्रवाल
धुळे : जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली राजकीय पार्टी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य असल्याचा सर्व कार्यकर्त्यांनी अभिमान बाळगावा. भाजपाच्या विजयी घोडदौडीत बुथ रचना व शक्तीकेंद्र यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन धुळे महानगरातील आझाद नगर, पश्चिम देवपूर व पेठ विभाग मंडलाच्या बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पक्ष पदाधिकारी व नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या प्रमुख बैठकीत मार्गदर्शन करताना अनुप अग्रवाल यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात जनहितोपयोगी विविध योजना व सवलती विषयी जनजागृती करण्यासाठी व राज्यातील आघाडी सरकार प्रती असलेली असंतोषाची भावना आंदोलनाच्या रूपाने जनतेपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांची असल्याचे अनुप अग्रवाल यांनी सांगितले. आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकासाठी बुथ रचने संदर्भात प्रदेश भाजपाच्या आदेशानुसार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकांचे प्रास्तविक बबन चौधरी, अमित भोसले, राहुल तारगे यांनी केले. बुथ रचना व शक्ती केंद्रे या संदर्भात महानगर संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर व सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, चंद्रकांत गुजराथी विस्तृत विवेचन केले. या बैठकीस प्रदेश कार्यकारीणी सदस्य भिमसिंग राजपूत यांनी संबोधित केले. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शाहू महाराज कलामंदिरात होणाऱ्या शिवगान स्पर्धेत स्थानिक कलावंतानी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन धुळे महानगर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रमुख राहुल बागुल यांनी केले. तसेच दि. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी स्व. दिनदयाळजी उपाध्याय यांच्या स्मुर्तीदिनी आयोजित केलेल्या समर्पण निधीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी जयश्री अहिरराव,प्रदीप कर्पे, नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, भगवान गवळी, अमृता पाटील, अजय अग्रवाल, अनिल थोरात, भिकन वराडे, कमलाकर अहिरराव, विनायक अहिरे, छोटू थोरात, अमोल धामणे आदी उपस्थित होते़