धुळे जिल्ह्यात दिव्यांगांसाठी तक्रार अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:19 IST2019-11-18T11:19:29+5:302019-11-18T11:19:52+5:30
सहाय्यभूत सेवासुविधा पुरविण्याच्या सूचना, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आदेश

धुळे जिल्ह्यात दिव्यांगांसाठी तक्रार अधिकारी नियुक्त
आॅनलाइन लोकमत
धुळे : दिव्यांगांच्या तक्रारी निवारण्यासाठी असलेल्या तरतुदीनुसार तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तरावर प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तर महापालिका स्तरावर प्रशासन अधिकाºयाची तक्रार निवारण अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थानच्या शाळा, खाजगी, अनुदानित, खाजगी विनाअनुदानित, मान्यताप्राप्त शाळांमध्ये दिव्यांगासाठी सोयीसुविधांची अंमलबजावणीसाठी समावेशीत शिक्षणास प्रोत्साहनासाठी विशिष्ट उपाययोजना कराव्या लागतात. या समस्यांबाबत दिव्यांगाना संबिंधत अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल, या संदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने चारही तालुक्यातील गटशिक्षण अधिकाºयांना पत्र पाठविले आहे. याद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांची तत्काळ तक्रारी स्वीकारली जाणार आहे.
चारही तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना २१ प्रकारच्या विशेष गरजा पुरविणे, प्रवेशासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय करणे, गरजेनुरूप शैक्षणिक उपचारात्मक सहायक करणे आणि सोयीसुविधा वेळेत पुरविणे आदी जबादारी या अधिकाºयांना पार पाडावी लागेल.
दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत भेदभाव टाळणे, नजीकच्या नियमित शाळेत प्रवेश देणे, खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांत संधी देणे, शाळा इमारती व परिसरात संचारमुक्त तसेच अडथळा विरहित वातावरण निर्माण करणे, त्यांना सहाय्यभूत सेवा पुरविणे आदी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. अंध, बधिर, किंवा एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना संभाषणास सुलभ होईल अशा भाषा व संदेश वहनाच्या माध्यमांचा उपयोग केला जावा, मदतनिसांची सुविधा पुरविण्यात यावी आदी सूचना करण्यात आलेली आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी व माध्यमिकचे शिक्षणाधिकाºयांनी या संदर्भात सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांना कळविले आहे.