बोरसे कॉलनीत काँक्रीट गटार व रस्ते कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:24 IST2021-02-22T04:24:51+5:302021-02-22T04:24:51+5:30
याठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती. येणा-जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यावरून ...

बोरसे कॉलनीत काँक्रीट गटार व रस्ते कामाचा शुभारंभ
याठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती. येणा-जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यावरून आमदार फारूक शाह यांनी भेट देत पाहणी करत नागरिकांना आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार स्थानिक विकास निधीतून बोरेसे कॉलनी येथे १० लाखाची काँक्रीट गटार आणि १० लाखाच्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. महानगरात आतापर्यंत ६० लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदार शाह यांच्या हस्ते झाले.
या कामाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार फारूक शाह यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते सलीम शाह, शहराध्यक्ष सेहबाज शाह, मुजम्मील शाह, परवेज शाह, नीलेश काटे, शकील मिस्त्री, शब्बीर बाबा, जुनेद शाह, अकिल अन्सारी, हेमंत गायकवाड, समद पठाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.