राम मंदिर उभारणीसाठी आ. कुणाल बाबा युवा मंचकडून ५१ हजारांचा निधी सुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST2021-02-09T04:38:42+5:302021-02-09T04:38:42+5:30

आयोध्येतील रामजन्मभूमीत तीर्थक्षेत्र राम मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. त्या अनुषंगाने देशभरातील विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत निधीची ...

Come for construction of Ram temple. Fund of Rs. 51,000 handed over from Kunal Baba Youth Forum | राम मंदिर उभारणीसाठी आ. कुणाल बाबा युवा मंचकडून ५१ हजारांचा निधी सुपुर्द

राम मंदिर उभारणीसाठी आ. कुणाल बाबा युवा मंचकडून ५१ हजारांचा निधी सुपुर्द

आयोध्येतील रामजन्मभूमीत तीर्थक्षेत्र राम मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. त्या अनुषंगाने देशभरातील विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत निधीची उभारणी केली जात आहे. राम मंदिर उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा ह्या हेतूने आ. कुणाल बाबा युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी ५१ हजार रुपयांचा निधी जमा केला. सदर जमा केलेला निधी राम मंदिर तीर्थक्षेत्र समर्पण समितीकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे,पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, जि.प.सदस्य विशाल पाटील, पं.स.धुळेचे गटनेते पंढरीनाथ पाटील, गरताड माजी सरपंच अरुण पाटील, माजी नगरसेवक गुलाबभाऊ माळी, साक्री तालुका काँग्रेसचे दीपक साळुंके, काँग्रेस वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, कृष्णा पाटील, रावसाहेब पाटील चांदे,युवक काँग्रेसचे संदीप पाटील, पप्पू पाटील बोरकुंड, सदाशिव वाघ शिरधाणे प्र.नेर आदी उपस्थित होते. राम मंदिर तीर्थक्षेत्र समर्पण समितीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौवटीया, विश्‍व हिंदू परिषदेचे योगीराज मराठे, निलेश रुणवाल, विनोद सोमाणी, भरत देवळे यांनी हा निधी स्वीकारला.

Web Title: Come for construction of Ram temple. Fund of Rs. 51,000 handed over from Kunal Baba Youth Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.