जिल्हाधिकारी निवासस्थान रस्ता अंधकारमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST2021-04-03T04:32:17+5:302021-04-03T04:32:17+5:30
या रस्त्यावर आधी लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. साक्री रोडवर देखील दुभाजक टाकले असले तरी अजूनपर्यंत पथदिवे लावलेले नाहीत. त्यामुळे ...

जिल्हाधिकारी निवासस्थान रस्ता अंधकारमय
या रस्त्यावर आधी लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. साक्री रोडवर देखील दुभाजक टाकले असले तरी अजूनपर्यंत पथदिवे लावलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर रात्री अपघात होण्याचा धोका वाढला आहे. दोन तीन अपघातही झाले आहेत. पथदिव्यांचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात पथदिवे बसवण्यात आले आहेत. पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो. तरी देखील शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा रस्ता धुळे शहर आणि देवपूरला जोडतो. या रस्त्यावरुन अधिकारी, कर्मचाऱ्यांची ये-जा असते. उशिरापर्यंत काम करणारे कर्मचारी या रस्त्याने जातात. त्यामुळे या रस्त्यावर पथदिवे बसवविण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला या रस्त्यावर लुटण्यात आले होते. एका राजकीय पदाधिकाऱ्यावर दगडफेक देखील झाली होती. त्यामुळे पथदिवे लावणे आवश्यक झाले आहे.