शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

मदतफेरीत १ लाख ६४ हजाराचा निधी गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 12:19 IST

शिरपूर : ३५ विविध संघटनेतर्फे शहिदांना श्रध्दांजली

शिरपूर : शहीदांची जबाबदारी सामाजिक व बुद्धिवादी लोकांची आहे. समाजाची प्रामाणिकपणे काम करणे व देशाप्रती प्रेम बाळगणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी व्यक्त केले. दरम्यान, शहिदांच्या परिवारासाठी मदतफेरी काढून १ लाख ६४ हजार रूपये गोळा करण्यात आलेत़पुलवामा-जम्मू काश्मीर येथे जैश ए मोहम्मद या आत्मघातकी हल्ल्यात ४४ सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे तसेच शहिदांच्या परिवारासाठी मदतनिधी जमा करण्यासाठी २१ रोजी संध्याकाळी कँडल मार्च व मदतफेरी काढण्यात आली.शहरातील बसस्थानका समोरील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यलयापासून विविध मार्गावरुन कँडल मार्च व शहीद सैनिकांच्या परिवारास मदतफेरी काढण्यात आली. यावेळी कँडल मार्चमध्ये सहभागी लोकांनी या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून सहभाग घेतला होता. मदत फेरीत व्यावसायिकांकडून मदत गोळा करण्यात आली. आर्मी जवान प्रेमचंद भामरे यांच्याकडे ज्योत होती.यावेळी शहीद स्मारकाजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक संजय सानप, पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे आदी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वच संघटनाच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनीही भावना व्यक्त केल्या.शिरपूर येथील या संघटना व संस्थांचा समावेशया मदतफेरीमध्ये वकील संघ, डॉक्टर्स क्लब, मेडिकल केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, आर्किटेक्ट व इंजिनियर्स असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, पॅथोलॉजी व लॅब संघटना, पत्रकार संघ, व्यापारी असोसिएशन, योग विद्या धाम, किराणा व्यापारी असोसिएशन, तालुका सिड्स पेस्टीसाईड्स फर्टिलायझर डीलर्स असोसिएशन, झूलेलाल सिंधी सेवा मंडल, क्षत्रिय अहिर शिंपी शिक्षण प्रसारक मंडळ, अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था, स्टॅम्प वेंडेर संघटना, बारी समाज पंच मंडळ, नवयुवक मित्र मंडळ, बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र, भारतीय जैन संघटना, स्वाभिमान प्रतिष्टान, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, ब्राह्मण सभा, सीए आणि टॅक्स कन्सल्टंट्स, धनगर महासंघ, अखिल भारतीय गुर्जर परिषद, एस़आऱबी़ इंटरनॅशनल स्कूल दहिवद, ट्रक मालक युनियन, महाराष्ट्र बँक या संघटनांचा समावेश होता.

टॅग्स :Dhuleधुळे